माण तालुक्यातील एका मुख्याध्यापकावर गुन्हा
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ जुलै २०२५ - माण तालुक्यातील सोकासन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक रामचंद्र पानसांडे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे ३० टक्क्यांचे दिव्यांगत्व असतानाही त्याने ४० टक्क्याचे बोगस प्रमाणपत्र तयार केले होते. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये - दाखल केले असते खरी स्थिती समोर आली. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सुचनेनुसार हा शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीएसआय गवळी तपास करत आहेत.
No comments