'तो' संशयित मृतदेह साखरवाडी येथील वृद्धाचा ; उन्हाच्या तीव्रतेने हृदयविकाराचा झटका येऊन मयत
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ मे - पिंपळवाडी, साखरवाडी येथे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले होते, मात्र फलटण ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात सदरचा मृतदेह हा पिंपळवाडी येथीलच डोक्याने वेडसर असणाऱ्या ७५ वर्षीय इसमाचा असल्याचे निष्पन्न झाले असून, पोस्टमार्टम रिपोर्टनुसार हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे पोलिसांनी कळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक ५ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्यापूर्वी लनक्की तारीख व वेळ माहित नाही) मौजे पिंपळवाडी ता. फलटण गावचे हद्दीत सरुबाई बबन भोसले यांचे शेत जमीन गट नंबर ७९ मध्ये बाबुराव विठ्ठल भोसले वय ७५ वर्षे राहणार आंबेडकर नगर, साखरवाडी तालुका फलटण यांचा उन्हाच्या तीव्रतेने हृदयविकाराचा झटका येऊन मयत झाला असावा अशी फिर्याद मयताचा भाऊ दादा विठ्ठल मोहिते वय ६८ वर्षे राहणार आंबेडकर नगर साखरवाडी तालुका फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.
No comments