महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद
सातारा दि. ४ (जि.मा.का.) पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग यांनी महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या महापर्यटन उत्सवाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. या सांगता समारंभात सादर करण्यात आलेल्या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलाकारांना उत्स्फूर्त दादही दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रा. राम विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आ. डॉ.अतुल भोसले, आ. सचिन पाटील, आदी उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमात भारुड, वारी, हास्य जत्रा, लावणी मराठी गीते, विनोदी प्रहसन अशा कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्र कीर्ती प्रतिष्ठान पुणे यांचे भव्य दिव्य असे शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. एकापेक्षा एक बहारदार, खुमासदार आणि दर्जेदार अशा या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीने पर्यटक, प्रेक्षक अशा सर्वांचीच मने जिंकली आणि तेवढीच दादही मिळविली.
No comments