Breaking News

उत्तर कोरेगाव भागातील एमआयडीसीसह पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Committed to solving water problem with MIDC in North Koregaon area - Hon. Ranjit Singh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिलेला शब्द पाळतात,त्यांच्या सोबतीने उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडवून,या भागात एमआयडीसी उभी करुन, तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करु असे,आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

    पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथे उत्तर भागाच्यावतीने नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांचा सत्कार सभारंभ व मतदारांचा आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते,राष्ट्रावादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर,जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे,माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ,अमित चव्हाण,यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पाणी हा या भागाचा जिव्हाळयाचा प्रश्न आहे.तो सोडविल्याशिवाय सत्काराचा हार स्वीकारणार नाही.असे स्पष्टपणे खा.नाईक निंबाळकर म्हणाले,विरोधकांना मोठा गर्व होता.त्यामुळे येथील लोकांना मेंढरा प्रमाणे वागणूक दिली.त्यांच्याकडे तीस वर्ष सत्ता होती.ते जलसंपदा खात्याचे मंत्री झाले,मात्र छातीवर हात ठेऊन,केवळ खुर्ची उभावण्याचे काम त्यांनी केले.मात्र या भागाला पाण्यापासून वंचित ठेवले. लोकसभेला फेक नेरीटिव्हमुळे माझा पराभव झाला.

    मतदार संघात कामे करताना या भागाकडे माझे दुर्लक्ष झाले,तरीही ०.५२ टी एम सी पाण्याची तरतूद या भागासाठी केली आहे.अजित दादांनी हा प्रश्न मागणी लावण्याचा शब्द दिला आहे. ते शब्द पाळणारे नेते आहेत.त्यामुळे या भागाने सचिन पाटील यांना मताधिक्य दिले. महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू.तसेच जमिनीच्या उपलब्धेनुसार या भागात एम आय डी सी आणून उद्योगधंदे उभे करु.त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल. येणाऱ्या काळात या भागात महायुतीला बळकट करुन,स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही.

    विद्यमान आमदार सचिन पाटील म्हणाले,तुम्हीं मला उत्तर कोरेगाव तालुक्याचा सुपुत्र म्हणून निवडून दिले आहे.केंद्र व राज्य सरकार आपले असून निधीची काळजी करु नका, नियोजन आराखडा करुन,पाणी प्रश्न असेल,इतर प्रलंबित प्रश्न येत्या पाच वर्षात मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.प्रत्येक महिन्यातून चार दिवस उत्तर कोरेगावला देऊन,शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडवेल.त्यासाठी पाच वर्ष भरपूर आहेत.मला स्वतःसाठी काहीही मिळवायचे नाही.फक्त तुमच्यासाठी काम करायचे आहे.यावेळी रामभाऊ लेंभे,मंगेश धुमाळ,अविनाश फडतरे,विजय चव्हाण,यांची भाषणे झाली.

    प्रारंभी उत्तर कोरेगावच्यावतीने आमदार सचिन पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.त्यानंतर गावागावाच्या पदाधिकाऱ्यांनी आ.पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला शहाजी भोईटे,दतात्रय धुमाळ,सूर्यकांत निकम,दिपक पिसाळ, योगेश कर्पे,गुलाब जगताप, शशिकांत भोईटे,तानाजी शिंदे, अल्कश पवार,राजेंद्र धुमाळ,शेखर काटकर,हणमंत मुळीक,अमोल निकम,प्रवीण निकम, राजेंद्र भोईटे, मनोज कलापट, मंगेश शितोळे,सागर लेंभे,रणजित लेंभे व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments