Breaking News

दरे मुक्कामी असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली

Chief Minister Eknath Shinde's health deteriorated

    सातारा - प्रतिनिधी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या निवासस्थानी मुक्कामी आहेत.गृहमंत्री पदाची मागणी करूनही ती न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात शिंदे यांना घशाचे इन्फेक्शन झाले असून सध्या ते तापाने आजारी आहे या माहितीला सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पथकाने दुजोरा दिला आहे.

    महायुतीला महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असताना अद्यापही सत्ता स्थापनेची गाडी पुढे सरकलेली नाही .मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघारीचा दावा केला असला तरी महायुतीची बैठक रद्द करून ते शुक्रवारी अचानक दरे हे आपल्या गावी परतले यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी गृहमंत्री पदाची मागणी केली आहे त्यावर ते ठाम असून ते न मिळाल्याची त्यांची नाराजी असल्याच्या चर्चा आहे.

    प्रत्यक्षात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव कोणालाही न भेटणे टाळले आहे त्यांचे सहकारी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे त्यांच्या भेटीसाठी दरे गावी आले होते मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणावरून त्यांची भेट होऊ शकली नाही ते तातडीने मुंबईला रवाना झाले . काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी डॉक्टरांचे एक पथक दरे गावी रवाना झाले आहेत डॉक्टरांनी शिंदे यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या घशाला इन्फेक्शन आणि ताप असल्याचे सांगितले आहे गेल्या काही दिवसापासून त्यांना सर्दीचा त्रास सुरू होता दरे येथील गावी ते आरामासाठी आल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र ते नाराज असल्याच्या शक्यतांनी जोर धरला होता मुख्यमंत्र्यांना सध्या दोन दिवस आरामाची गरज आहे त्यानंतरच पुढील काय तो निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

No comments