Breaking News

पवार साहेब व सुभाषभाऊंच्या विचाराने वाटचाल करणार ; माढा निवडणूक दौरा सुरू - चेतन शिंदे

Will move with the thinking of Pawar Saheb and Subhash Bhau - Chetan Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - आदरणीय सुभाषराव शिंदे (भाऊ) यांनी आयुष्यभर आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना दैवत मानून, फलटण तालुक्यात प्रत्येक गावात आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागळात रुजविण्याचे काम केले. त्यांनी कोणत्या प्रकारची जात-पात, गट-तट न मानता सर्वसामान्य, गोरगरीबासाठी काम करत असताना राजकारणाची सुरुवात ते शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहिले. त्याचप्रमाणे भाऊंनी आम्हाला घालुन दिलेला आदर्श व विचार पुढे नेण्यासाठी रविवार, दि. ०७ एप्रिल २०२४ रोजी 'गोविंद बाग' या ठिकाणी जावुन आदरणीय पवार साहेबांचे आशिर्वाद घेतले असून, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदार संघातील फलटण तालुक्यातील  पवार साहेब व कै. सुभाषभाऊ यांच्या सहकाऱ्यांना, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, युवक-युवती, महिला तसेच महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आदरणीय पवार साहेबांचे व कै. सुभाषभाऊ यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत. आदरणीय पवार साहेब हेच आमचा पक्ष व उमेदवार असे मानुनच आम्ही काम करणार आहोत.

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. १५ एप्रिल पासून फलटण तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती दौरा करून पुर्ण ताकदीने हा विचारांचा लढा आम्ही आदरणीय पवारसाहेबांसोबत राहुन लढणार आहोत.

No comments