Breaking News

फलटणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खा. रणजितसिंह यांना विजयी करणे गरजेचे - समशेरसिंह नाईक निंबाळकर

MP Ranjitsinh needs to win for the overall development of Phaltan - Samshersinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोविड १९ चा काळ सोडला तर गेल्या अडीच वर्षांमध्ये जे काम माढा मतदार संघात केले आहे.  ते काम एवढे मोठे आहे, की देशातल्या पहिल्या दहा खासदारांच्या यादीत त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला जातो तसेच फलटणकरांना आपली कामे व्हावीत, फलटणचा विकास व्हावा असं वाटत असेल तर फलटणचा खासदार झालाच पाहिजे, फलटणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खा. रणजितसिंह यांना विजयी करणे गरजेचे असल्याचे मत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

    फलटण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व माण हे दोन तालुके माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनुप शहा यांच्याकडून फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समशेर सिंह नाईक निंबाळकर बोलत होते. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक विविध आघाड्या मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    मागील निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून मताधिक्य मिळाले परंतु आज ज्या पद्धतीने खासदारांनी फलटण शहरांमध्ये विकास कामे केली आहेत. ह्याच विकास कामांच्या जोरावर मी हे सांगू शकतो की, फलटणकर शहरातून खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देतील असा विश्वास फलटण शहर भाजप अध्यक्ष  अनुप शहा यांनी व्यक्त केले.

    या बैठकी करिता फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव ,बाळासाहेब कुंभार, डॉ.प्रवीण आगवणे, नंदकुमार घाडगे, सचिन अहिवळे, फलटण तालुका विधानसभा प्रभारी सचिन कांबळे पाटील, फलटण तालुका पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपकुमार जाधव व आभार प्रदर्शन निलेश खानविलकर यांनी केले.

No comments