Breaking News

निवडणुक खर्च निरिक्षक कुमार उदय साताऱ्यात दाखल

Election Expenditure Inspector Kumar Uday admitted to Satara

     सातारा दि. 13 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सातारा जिल्हयामध्ये जाहीर झाला असून दिनांक 16 मार्चपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे.  निवडणुक  प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुक  खर्च निरिक्षक कुमार उदय (I.R.S.) यांची भारत निवडणुक आयोगामार्फत नियुक्ती करणेत आलेली असून ते  12 एप्रिल  रोजी सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

    लोकसभा निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुक खर्चाच्या बाबतीत नागरिकांच्या काही शंका किंवा माहिती हवी असल्यास अथवा काही तक्रार असल्यास नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक 02162-299550 वर संपर्क करावा.  निवडणूक खर्चासंबधी काही शंका व तक्रारी असतील व त्याकामी निरिक्षक यांची समक्ष भेट हवी असल्यास भेटीच्या पूर्व परवानगीसाठी नोडल अधिकारी  बांधकाम विभाग (उत्तर) जिल्हा परिषद, साताराचे कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी यांचे भ्रमणध्वनी क्र. 9158549687 वर संपर्क करुन भेटीची पूर्व परवानगी घेण्यात यावी.

    निवडणूक खर्च निरिक्षक यांच्या पूर्वपरवानगीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 12 ते 3 या वेळेत शासकीय विश्रामगृह, सातारा या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी  केले आहे. निवडणुक खर्च निरिक्षक कुमार उदय यांचा भ्रमणध्वनी क्र. 9404345243 असा आहे.

No comments