Breaking News

फलटण येथे १००० मानवी साखळी द्वारे भारताचा नकाशा काढून मतदान जनजागृती

Voting awareness by drawing map of India through 1000 human chain at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ -  भारत निवडणूक आयोगा मार्फत स्वीप अंतर्गत मतदारा मध्ये मतदाना बाबत जनजागृती साठी  व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम द्वारे काम सुरु आहे. ४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २५५ फलटण (अ.जा. ) विधानसभा मतदार संघा मध्ये मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी फलटण येथे १३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्रीराम  एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे  मानवी साखळी द्वारे मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते.

    जितेंद्र डुडी  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी सातारा व  मोनिकासिंह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हा अधिकारी सोलापूर  व  याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, सचिन ढोले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव याच्या मार्गदर्शन खाली काम सुरु आहे.

    यावेळी अप्पर तहसीलदार मयूर राऊत  यांनी भारत निवडणूक आयोगा मार्फत विविध उपक्रम व  विविध स्तरावर  मतदारा मध्ये  मतदान बाबत जनजागृती स्विफ्ट अंतर्गत सुरू आहे त्याचा त्याचाच भाग म्हणून  भारताच्या नकाशामध्ये फलटण १०० टक्के मतदान मानवी साखळी द्वारे जनजागृती आयोजन केलं असल्याचे सांगून, नवं मतदार यांनी पुढे येऊन  मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक मतदार यांनी किमान १० मतदारांना मतदान करण्या बाबत  जनजागृती करण्यात यावी असे आवाहन करत  मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती उपक्रम स्वीप द्वारे करत असल्याचे यावेळी मयूर राऊत यांनी सांगितले.
यावेळी मुख्य अधिकारी नगर परिषद फलटण निखील मोरे, गट विकास अधिकारी फलटण चंद्रकांत बोडरे,यांनी मनोगत व्यक्त केले.

    मतदार जनजागृती चित्रकला चित्रे, हॅन्ड वेल,पथनाट्य, झांजपथक, स्काऊट गाईड, एनसीसी गाईड,अशा विविध कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती चे उपक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक  स्वीप सहायक अधिकारी सचिन जाधव  यांनी केले. आभार लक्ष्मण अहिवळे तलाठी यांनी मानले,

    यावेळी स्वीप नोडल ऑफिस एस. के. कुंभार, धन्वंतरी साळुंखे व पथक प्रमुख शहाजी शिंदे, पूजा दुदुस्कर स्वीप टीम तसेच  मुख्याध्यापक, प्राचार्य सर्वं  विभागातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक विद्यार्थी तसेच नगरपालिकेतील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, लायन्स क्लब  तसेच  सेवाभावी संस्था तसेच महिलां बचत गट तसेच मतदार उपस्थित होते.

No comments