Breaking News

हरवलेले मोबाईल शोधण्यात फलटण शहर पोलिसांना यश

Phaltan city police succeeded in finding the lost mobile phone

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० - हरवलेले मोबाईल हँडसेट शोधण्यात फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले असून, आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ३ मोबाईल फोनचा शोध लावून ते संबंधितांना परत करण्यात आले.

    हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईल फोनबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याने केले होते.

    या पार्श्वभुमीवर हरविलेल्या मोबाईल फोनबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झालेल्या घटनांपैकी (१) श्री फिरोज इब्राहीम शेख, रा. लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा, (२) श्री जय लालासो बोराटे, रा.बोराटेवाडी, ता.माण, जि. सातारा, (३) श्री बाबुराव जगन्नाथ ढमाळ, रा. मालोजीराजेनगर, कोळकी, ता. फलटण, जि. सातारा यांचे मोबाईल फोनचा फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शोध घेऊन ते वरील संबंधीतांना देण्यात आले आहेत.

    सदर कामगिरी  पोलीस अधीक्षक श्री समीर शेख,  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.हवा. चंद्रकांत धापते, पो.शि. स्वप्नील खराडे, अतुल बडे, सचिन पाटोळे, संभाजी जगताप यांच्या सहीत फलटण शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

    या पुढेही हरविलेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात येत असुन, या पुढेही असे अनेक मोबाईल फोन हस्तगत करण्यात येतील असे फलटण शहर पोलीस स्टेशन कडून कळवण्यात आले आहे.

No comments