मोबाईलद्वारे बँक खात्यातून केली महिलेची फसवणूक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : मोबाईलवर फोन करून आज्ञाताने खडकी ता. फलटण येथील एका महिलेच्या खात्यातील चौदा हजार रुपयांची रक्कम अन्य खात्यावर वळवून फसवणूक केल्याने आज्ञातावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत ग्रामिण पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, रेश्मा रमेश कोकरे, रा.खडकी ता. फलटण यांना दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक आज्ञाताचा मोबाईलवर फोन आला त्यावेळी त्याने कोकरे यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या अँपमधून १४ हजार ३३३ रुपये अन्य खात्यावर वळवून त्यांची फसवणूक केली. या बाबतची फिर्याद कोकरे यांनी दिली असून तपास पोलीस नाईक बनकर करीत आहेत.

No comments