सर्प दंशाने साखरवाडी येथील एकाचा मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : साखरवाडी ता. फलटण येथील सर्प दंश झालेल्या चाळीस वर्षीय इसमाचा सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
श्रीरंग जगन्नाथ मोरे वय ४० रा.साखरवाडी ता. फलटण असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, श्रीरंग मोरे याना सर्प दंश झाल्याने दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु २९ नोव्हेंबर रोजी त्यांचे उपचारादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास निधन झाले. सदर मयताचे कागदपत्रे सातारा शहर पोलीस ठाणे येथून पोस्टाने आल्याने १९ जानेवारी २०२४ रोजी त्यांची अकस्मात मृत्यू म्हणून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सहाय्यक फौजदार मोहन हांगे तपास करीत आहेत.

No comments