अयोध्या मुहूर्तावर फलटण येथे श्रीराम मंदिर शिखर जीर्णोद्धार शुभारंभ ; श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते महाआरती संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - आयोध्याला होत असलेल्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, आपण फलटणच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरांच्या शिखराचा जीर्णोद्धार करण्याचा शुभारंभ करत आहोत, त्याचबरोबर शहर व तालुक्यातील पुरातन मंदिरांचा देखील जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असतानाच, त्याच शुभ मुहूर्तावर फलटण येथे दुपारी १२.२० वाजता श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज् ट्रस्ट, फलटण यांच्या माध्यमातून फलटण संस्थानचे अधिपती व माजी सभापती, महाराष्ट्र विधान परिषद आ. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते श्रीराम मंदिराचा शिखर जीर्णोद्धार शुभारंभ सोहळा विधीपूर्वक करण्यात आला. तसेच आयोध्याच्या शुभमुहूर्तावर श्रीराम मंदिरात श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. प्रियालक्ष्मीराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलीराजे सत्यजितराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले यांच्यासह शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमंत सगुनामाता महाराज यांच्या काळातील ही सर्व मंदिरे आहेत, माझे आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या काळात मंदिरांचा जीर्णोद्धार झाला होता, त्यानंतर बरेच दिवस आमच्या मनात देखील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा विचार चालू होता, त्या अनुषंगाने आजच्या शुभ मुहूर्तावर आपण श्रीराम मंदिर शिखराचा जिर्णोद्धार करण्याचा शुभारंभ केला आहे. त्याचबरोबर श्री दत्त मंदिराचा आणि शहरातील इतर मंदिरांचा देखील जिर्णोद्धार करणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आज आयोध्याला श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. अनेक वर्षापासून आपल्या सर्वांच्या मनामध्ये अयोध्येत भव्य राम मंदिर हवे अशी इच्छा होती, ती आज पूर्णत्वास गेली आहे. आणि त्याच मुहूर्तावर फलटणच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर आणि दत्त मंदिर यांचा शिखर जीर्णोद्धार आपण करत आहोत. दोन्ही मंदिरांचा मंडपांचा देखील जीर्णोद्धार होणार आहे. पूर्वी ज्याप्रमाणे होता तशाच पद्धतीत आपण जीर्णोद्धार करणार असल्याचे जिल्हा परिषदेत माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments