Breaking News

कै.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन

Ritual worship of the image of Lord Sri Rama at Hindurao Naik Nimbalkar Warkari Bhavan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ -   कै.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन मलठण येथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाविक उपस्थित होते.

    रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या तिर्यक्षेत्र येथे संपन्न होत असताना कै.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन मलठण येथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन, श्रीरामरक्षा, मंत्रपठन, भजन व महाआरती तसेच प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्या स्थित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन फलटण तालुका भाजपा व शहर भाजपा व फलटण तालुका आध्यात्मिक आघाडी भाजपा यांच्या वतीने करण्यात आले होते. 

     दि.२२ जानेवारी २०२४ रोजी, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण, फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, सौ मनीषाताई नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता प्रभू रामचंद्र प्रतिमा पूजन करण्यात आले. सकाळी १० वाजता सांप्रदायिक भजन कार्यक्रम घेऊन, ११ ते १.३० वाजता प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना थेट प्रक्षेपण करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments