बाल लैंगीक अत्याच्यार केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व दंड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ - दि. २६ जानेवारी २०२० रोजी पिंप्रद येथे घडलेल्या बाल लैंगीक अत्याच्यार प्रकरणात सातारा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी सिद्ध करत,आज दिनांक २२/०१/२०२४ रोजी त्यास ३ वर्षे सक्तमजुरी व शिक्षा ठोठावली.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२६/०१/२०२० रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी नामे तानाजी दौलत भगत वय ५८ वर्ष रा. पिंप्रद ता. फलटण जि. सातारा याने त्याच्या राहते घरात फिर्यादी यांची पिडीत मुलगी हिस गोड बोलून घरात नेवुन, त्याने त्याच्या घराचा दरवाजा बंद करुन, पिडीतेवर बळजबरी करणेचा प्रयत्न केला. म्हणुन वगैरे मजकुराची खबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उप-निरीक्षक यु.एस. शेख फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी करुन मा. न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.
सदरचा खटला श्रीमती के.व्ही. बोरा विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश सो, सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे श्री. महेश शिंदे सहा. जिल्हा सरकारी वकील, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद केसमध्ये एकुण ०७ साक्षीदार तपासले, केवळ परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत न्यायालयात समोर आलेला पुरावा व सरकारी वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य मानुन विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आज दिनांक २२/०१/२०२४ रोजी यातील आरोपीस भा. द. वि. कलम ३५४ (अ) अन्वये १ वर्ष सक्त मजुरी तसेच बालकाचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ७,८ अन्वये ३ वर्ष सक्त मजुरी व रु.१,०००/- दंड, दंड न भरलेस १ महिना साधी कैद व बालकाचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम १२ अन्वये १ वर्ष मजुरी व रु.५००/- दंड न भरलेस १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा दिली आहे.
उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस फलटण विभाग फलटण, श्री. सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन म.पो.हवा.ब.नं.२०८५ साधना कदम व पो. अंमलदार ब.नं. १६१७ बडे नेमणुक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी कामकाज पाहिले. याकामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उप-निरीक्षक श्री. उदय दळवी, श्री. सुनिल सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. फौजदार शशिकांत गोळे, पोलीस अंमलदार पो. हवा, १६८४ श्री. गजानन फरांदे, पो.हवा. १९७ मंजूर मणेर, म. पो. हवा १६४४ शेख, पो. अंमलदार अमित भरते ३८६ यांनी योग्य ती मदत केली.

No comments