Breaking News

फलटणमध्ये रस्ता क्रॉस करणाऱ्या वृद्धाला दुचकीची धडक ; वृद्धाचा मृत्यू

Old man hit by bike in Phaltan; Death of an old man

    फलटण (गंधर्वता वृत्तसेवा) दि.११ - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान, हॉटेल ऋतुराज समोर, दुचाकी स्वाराने, रस्ता क्रॉस करणाऱ्या  पादचाऱ्याला ठोकरल्याने, झालेल्या अपघातामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १०/१/२०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छ. शिवाजी महाराज चौक जाणाऱ्या रस्त्यावर ऋतुराज हॉटेलचे समोर, फलटण  येथे अरुण तुकाराम खटावकर वय ७३ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, बारसकर गल्ली फलटण  हे रस्ता ओलांडत असताना, त्यांच्या पाठीमागुन अज्ञात मोटार सायकल वरील चालकाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने अविचाराने भरधाव वेगात, त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चालवून जोराची धडक दिली. सदर अपघातात खटावकर यांच्या डोकीस अंतर्गत गंभीर दुखापत होवुन ते मयत झाले आहेत. अपघाता नंतर अज्ञात मोटार सायकल वरील चालकाने जखमीस उपचारास न नेता व पोलीस ठाणेस अपघाताची माहिती न देता अपघात ठिकाणा वरुन निघून गेला असल्याची फिर्याद ओंकार अरुण खटावकर यांनी दिली आहे.

No comments