चौधरवाडी येथे उद्यानकन्यांद्वारे निबंध लेखन व खो-खो स्पर्धांचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील उद्यानकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चौधरवाडी हायस्कूल,चौधरवाडी येथे गुरुवार दि.११ जानेवारी, २०२४ रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध लेखन व खो-खो स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले, तसेच खेळाडूंसाठी प्रथमोपचार पेटी देण्यात आली. हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजित गायकवाड सर आणि श्री.अविनाश साळवे सर यांच्या उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी , प्रा. जे. व्ही. लेंभे व प्रा.ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या भोईटे पायल,देशपांडे सई ,गोळे विभूती,जाधव साक्षी,लाळगे श्वेता, नाळे निकिता यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
No comments