सातारा जिल्हा क्लस्टर हेड पदी जमशेद पठाण यांची निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ - राष्ट्रीय उद्धमिता व औद्योगिक विकास कार्पोरेशन मायक्रो स्मॉल सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या सातारा जिल्हा क्लस्टर हेड पदी जमशेद पठाण फलटण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र एम एस एम ई निडको गव्हरमेंट अॉफ इंडिया चिफ मॅनेजिंग डायरेक्टर एस. के. सिंग यांनी दिले आहे.
जमशेद पठाण यांनी सांगितले की एम एस एम इ हे केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने जिल्हा महाराष्ट्र व पूर्ण देशात बेरोजगार, लघु मध्यम उद्योग, बाजारपेठेतील लहान मोठे व्यापारी, शेतकरी, बचत गटांना व लघु उद्योगांना राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने उद्योग सक्षम करण्याचे कार्य करते. देशातील रोजगार व उद्योग वाढवण्यासाठी ही यंत्रणा काम करते नीडको ही भारत सरकारच्या एम एस एम इ सिडको बँकेची नोडल एजन्सी असून ती मुद्रा लोन स्टॅन्ड अप इंडिया लोन उद्धमी मित्र नवोद्योजकांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते तरी नव उद्योजक शेतकरी गट महिला बचत गटांनी छोटे-मोठे व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व 81 77 87 12 21 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
No comments