Breaking News

मारहाण होणार असल्याची डायल 112 नंबरला खोटी तक्रार ; गुन्हा दाखल

False complaint about being beaten up on dial 112; case registered

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ मे - माझे घरगुती भांडण चालु आहे व मला मारहाण होऊ शकते, असा डायल ११२ नंबरला कॉल करून,  मारहाण होणार असल्याबाबतची खोटी तक्रार दिल्याप्रकरणी साठे तालुका फलटण गावातील एका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या पुढे ११२ नंबरला खोटा कॉल केला तर गुन्हा दाखल होणार आहे, तसेच दारू पिऊन कॉल केला तर दारूबंदी कायदा कलम ८५ प्रमाणे जागेवर अल्कोहोल टेस्ट करून कारवाई होणार असल्याचे सांगतानाच कोणत्याही पब्लिक सर्विसचा कोणीही गैरवापर करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.०१/०५/२०२५ रोजी ८.२६ वाजता मौजे साठे ता. फलटण गावचे हद्यीत ईसम नामे रविंद्र बाळासो कदम वय ४८ वर्षे, रा साठे ता फलटण जि सातारा, यांचेशी कोणीही भांडण करत नसताना व त्यांना मारहाण होण्याची अजिबात शक्यता नसताना, केवळ पोलीसांची दिशाभुल करण्याचे उद्देशाने त्यांनी डाईल ११२ वर फोन करुन, माझे घरगुती भांडण चालु आहे व मला मारहाण होऊ शकते अशी खोटी माहीती देवून पोलीस विभागाची दिशाभुल केली निदर्शनास आल्यानंतर त्याच्या विरुध्द भारतीय न्याय  संहिता कलम २१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments