Breaking News

साताऱ्यात ड्रग इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश ; 5 आरोपींना अटक

Drug injection racket busted in Satara; 5 accused arrested

    सातारा दिनांक ९ प्रतिनिधीसातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरांमध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे .या प्रकरणांमध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकूण पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    शिवराज पंकज कणसे वय 24 राहणार हिलटॉप सोसायटी शाहूनगर गोडोली, साई कुमार महादेव बनसोडे वय 25 राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर, सुदीप संजय इंगळे वय 19 राहणार कोयना सोसायटी सदर बाजार सातारा , अतुल विलास ठोंबरे वय 20 राहणार झेडपी कॉलनी शाहूपुरी सातारा, तयब हाफिस खान वय तेवीस राहणार बांगुर नगर गोरेगाव मुंबई या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    या कारवाईमुळे साताऱ्यातील नशेखोर प्रवृत्ती समोर आल्या आहेत .ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि त्यांच्या पथकाने केली आहे गुन्हे प्रकटीकरण शाखेची पोलीस अधिकारी आणि पथक यांना नशा करणाऱ्या काही युवकांची गेल्या दोन महिन्यापासून माहिती मिळाली होती .हे पथक त्या युवकावर नजर ठेवून होते . परंतु सदरचा युवक हा आपण सापडू नये यासाठी दक्षता बाळगत होता . डीबी पथकाने सलग दोन महिने गोपनीय तपास करून सातारा शहराला हे इंजेक्शन पुरवणाऱ्या युवकांची माहिती प्राप्त केली .या युवकाकडून या मालाची चोरटी विक्री केली जात होती दोन मे 2025 रोजी चार भिंती परिसरात तो माल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार परिसरात सापळा रचण्यात आला सदरचा युवक चार भिंती परिसरात एका बंद टपरीच्या आडोशाला संशयास्पद रित्या आढळून आला.

    पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या 30 बाटल्या आढळून आल्या प्रथम त्यांनी उडवाउडवीची ची उत्तरे दिली त्यास अटक करून पोलिसांनी त्याची रिमांड घेतली आणि सखोल चौकशी केली असता त्यानेही इंजेक्शन मुंबई येथून एका युवकाकडे चोरट्या पद्धतीने खरेदी केले व ते प्राप्त झाल्यावर थोड्या थोड्या प्रमाणात देऊन त्यांचा पुरवठा नशा करणाऱ्या युवकांकडे थोड्या थोड्या पद्धतीने होत असल्याचे सांगितले .संबंधित युवक त्याच्या विश्वासातील लोकांनाच हा माल पुरवत होता सदर सप्लाय करणाऱ्या तीन युवकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यापैकी एक जण शिकाऊ डॉक्टर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . चारही युवकांना अटक करण्यात आलेले आहे मुंबई येथून ज्या ठिकाणाहून सप्लाय होत होता तेथील युवकाचा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पाठपुरावा करून त्याला ताब्यात घेतले . या कारवाईत आत्तापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

No comments