मी म्हणजे ढोले साहेब नाही, मी कमीन्स कंपनीचे पाणी मी बंद करेन ; प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांची कमिन्स कंपनीला वार्निंग
फलटण (ॲड. रोहित अहिवळे) दि.९ - कमिन्स कंपनीकडून जो सीएसआर निधी दिला जातो त्यामध्ये शासकीय कार्यालयाने जर काही मागणी केली तर कंपनीकडून निधी देण्यात येत नाही, या धोरणात कमिन्स कंपनीने सुधारणा करावी अशा सूचना देतानाच, मी म्हणजे ढोले साहेब नाही, मी कमीन्स कंपनीचे पाणी मी बंद करेन अशी वार्निंग उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियंका आंबेकर यांनी कमिन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
कमिन्स कंपनीबाबत आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी फलटण तहसील कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर बोलत होत्या. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, कमीच कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कमीन्स कंपनीच्या सीएसआर निधी बाबत काही जणांनी तक्रारी सांगितल्या. त्यावर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी कमिन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना सीएसआर निधीबाबत पारदर्शक काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी सीएसआर निधीच्या बाबत खंत व्यक्त करून कमिन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपरोक्त इशारा दिला.
No comments