Breaking News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले फलटणच्या श्रीरामाचे दर्शन


Deputy Chief Minister Devendra Fadnavis took darshan of Sri Rama of Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटणच्या ऐतिहासिक व प्राचीन अश्या श्रीराम मंदिरातील, श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानजी यांच्या मूर्ती देखील तितक्याच सुंदर आहेत, त्यांना पाहून मनाला आनंद वाटला असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्ये आल्यावर, श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापतो तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण, आ.छ. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

    आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विनंतीला मान देवून मी येथे आलो असल्याचे सांगतानाच फलटणचे श्रीराम मंदिर मला एवढे आवडले आहे की यापुढे फलटणमध्ये आल्यावर श्रीरामाचे दर्शन घेतल्या शिवाय मी जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

No comments