छत्रपती उदयनराजे व श्रीमंत रामराजे यांची भेट ; चर्चेला उधाण
![]() |
विधान परिषदेत माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व खा. छत्रपती उदयनराजे भोसले |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.१७ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर होते. त्याप्रसंगी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले त्यांच्या जाहीर सभेला उपस्थित होते. सभेनंतर त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील निवासस्थानी भेट घेतली. मात्र या दोन राजांच्या झालेल्या भेटीने सातारा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले.
विधान परिषदेत माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वांना ज्ञात आहे. परंतु अलीकडील काळात दोन्ही नेत्यांची जवळील वाढली आहे. लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली असून, या भेटीमुळे येणाऱ्या काळात राजकारणाची समीकरणे बदलतात का? याचीही चर्चा फलटण तालुक्यात होत होती.
खा. छत्रपती उदयनराजे चिडले की बरं वाटतं, मात्र हसले की पोटात गोळा येतो अशी मिश्किल टिप्पणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली.
No comments