Breaking News

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चायनीज मांजा वापरणार नसल्याची घेतली शपथ

चायनीज मांजा वापरणार नसल्याची शपथ देताना प्रा. सतीश जंगम, मारुती भिसे, सौ. मीना नेवसे, रवींद्र शिंदे, व शपथ घेताना विद्यार्थी

Students of Smt. Premalatai Chavan High School vowed not to use Chinese Manja

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० -  श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्यासाठी नायलॉन किंवा तंगुसचा चायनीज दोरा (मांजा) वापरणार नसल्याची शपथ घेतली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

     फलटण शहर व परिसरामध्ये नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा फार मोठी आहे. फलटण शहर व तालुक्यातील लहान मुलापासून अनेक तरुण, वृद्ध लोक दिवसभर पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात, यामध्ये व्यापारी सुद्धा आपले व्यवसाय, दुकान बंद करून हा आनंद लुटत असतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये हा पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या चायनीज मांज्या मुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांना अपघात झाला आहे. आज पर्यंत या परिसरात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक जण जखमी तर काही मृत्यू पावले आहेत. आणि म्हणूनच अशा पद्धतीचा नायलॉनचा चायनीज मांजा न वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात समाजात प्रबोधन सुरू आहे. हे लक्षात घेऊन श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रा. सतीश जंगम यांच्या विचार कल्पनेतून त्यांनी आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेला पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा चायनीज मांजा न वापरण्याची शपथ दिली. व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण अशा पद्धतीचा चायनीज माझ्या वापरणार नसल्याचे मान्य केले. शाळेच्या या अभिनव उपक्रमाबद्दल समाजातून या शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.

    शपथ घेण्यापूर्वी प्रा. सतीश जंगम यांनी नायलॉनचा किंवा तंगुस चायनीज मांजा वापरल्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला इजा किंवा अपघात होतो आणि हा चायनीज मांजा झाडावर गुंतून राहिल्यामुळे झाडावरील पशुपक्ष्यांचे पाय, पंख यामध्ये अडकून पडतात व त्यातून सुटका न झाल्यामुळे पशुपक्ष्यांना सुद्धा मृत्यू येऊ शकतो हे सांगून अशा पद्धतीचा नायलॉनचा दोरा पतंग उडवण्यासाठी वापरू नये अशी माहिती दिली.

    प्रा. सतीश जंगम यांनी विद्यार्थ्यांना ही शपथ दिली यावेळी प्राचार्य रणदेव खराडे, प्रा. रवींद्र कोकरे, रविंद्र शिंदे, वासुदेव सुपे, रवींद्र लडकत, सौ.संध्याराणी शिंदे, मारुती भिसे, सौ. मीना नेवसे, अभिजित गायकवाड, सौ. स्वाती माने  हे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments