विडणी गावाचा विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे ; पोटनिवडणुकीत विरोधकांचा राजकीय नायनाट करणार - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि १७ : विडणी गावाचा तसेच विविध भागातील विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपत असून, आत्तापर्यंत केवळ राजकारणातून पैसा व पैशातून सत्ता अशी चुकीची भूमिका घेऊन, गावाचा विकास करण्या ऐवजी गाव भकास करण्यात विरोधकांनी धन्यता मानली,आता या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत विरोधकांचा पराभव करून, नागरिकांनी गावच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी मतदारांना केले.
ग्रामीण विकासाचे मुख्य घटक असलेले कच्चे रस्ते,पक्के केले, पूल,नाल्या,पेयजल, वीज, शाळा इमारती,सामुदायिक केंद्र, दवाखाने बांधणे अशी कामे केली.आहेत त्यामुळे विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहनही अभंग यांनी केले.
विडणी येथे झालेल्या कोपरा सभेत मार्गदर्शन करताना सागर अभंग म्हणाले की, ही पोटनिवडणूक साधी नाही,हा लढा आहे स्वाभिमानाचा, विकासाचा आणि सत्तेवर आपला हक्क सिद्ध करण्याचा!
विडणी ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य अपात्र झाले,पण काही जणांना वाटतंय की आता मैदान मोकळं आहे! परंतु त्यांना स्पष्ट सांगतो, विडणी अजून स्वाभिमानाने जिवंत आहे, आणि विडणीकर अजून पूर्णपणे जागे आहेत! आत्तापर्यंत त्यांना तुम्ही विकासापासून वंचित ठेवले,ही निवडणूक आम्ही फक्त लढणार नाही, तर विरोधकांचा राजकीय वारसा अन् नकाशाच पुसून टाकणार आहोत!प्रत्येक गल्लीमध्ये जाऊ,प्रत्येक घरात जाऊ…
आणि लोकांना विचारू, विकास हवा का की याचं फक्त आश्वासनं? आमचा निर्धार ऐका, “एकही जागा सोडायची नाही…सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवायचाच!” जे लोक वर्षानुवर्षे फक्त राजकारण करत बसले त्यांना आता विडणीकर मतातून उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.
मी आज उघड आव्हान देतो, कोणाच्याही बापाचं राज्य नाही इथे! निर्णय फक्त विडणीकरांचा होणार, आणि विजय फक्त विकास आघाडीचाच होणार! चला, एकदिलाने उभे राहूया,आता यापुढे भीती नाही,दबाव नाही फक्त गावाचा विकास अन् विकास होईल,आता फक्त एकच लक्ष्य सर्व जागांवर भगवा फडकवयाचा आहे, विडणी ठरवणार अन् इतिहास घडवणार! जय विडणी! जय विकास! जय आघाडी!असा संदेश लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिला.

No comments