रमाई आवास योजनेंतर्गत 10 कोटी 28 लाख रुपयांच्या 857 घरकुलांना मंजुरी
सातारा - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास (घरकुल) योजना राबविण्यात येते. या योजनेची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून यामध्ये 857 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून या घरकुलांसाठी 10 कोटी 28 लाख 40 हजार रुपयांचा खर्च होणार आहे.
या बैठकीला आमदार दीपक चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तालुकानिहाय मंजुर घरकुलांची संख्या पुढीलप्रमाणे. जावली 23,कराड 100, खंडाळा व खटाव 50, कोरेगाव 61, महाबळेश्वर 34, माण 100, पाटण 150, फलटण 134, सातारा 105 व वाई 50 असे एकूण 857 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
अनूसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारचे पक्के घरे बांधणे शक्य होत नाही, पर्यायाने त्यांना झोपडीमध्ये वास्तव्य करावे लागते. ग्रामीण भागातील अनूसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून लाभार्थ्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्या घराच्या ठिकाणी पक्के घर देणे हा शासनाचा मुळ उद्देश आहे.

No comments