Breaking News

लेह येथील दुर्घटनेत राजळे येथील जवान वैभव भोईटे शाहिद

Jawan Vaibhav Bhoite Shahid from Rajle in Leh accident

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - काश्मिर खोऱ्यातील लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना, लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातामध्ये ९ जवान ठार झाले असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपुत्र वैभव संपतराव भोईटे हे शहीद झाले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.वैभव भोईटे यांचे पार्थिव उद्या दुपारी राजाळे येथे येईल शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी संध्याकाळी लेहमधील न्योमा भागातील कियारी येथे लष्कराचे वाहन रस्त्यावरुन घसरुन खोल दरीत कोसळले. या वाहनात कर्तव्यावर निघालेले जवान होते. या दुर्घटनेत ९ जवानांसह एका ज्युनियर ऑफिसरचा (जेसीओ) मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाले आहेत. ही घटना कळताच लष्कराकडून तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. मात्र या घटनेत ८ जवानांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण जखमी झाले आहे. दोघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरु असताना त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत राजाळे येथील वीरजवान वैभव भोईटे यांचा समावेश असल्याचे वृत्त गावकऱ्यांना कळाले. देशासाठी आपल्या गावचा वीर शहीद झाल्याच्या अभिमानाने सर्वांची छाती अभिमानाने भरुन गेली. मात्र, सुपुत्र गमावल्याचे दुःखही असल्याने राजाळे गावावर शोककळा पसरली आहे.

 

No comments