Breaking News

नागपंचमीला वापरल्या जाणाऱ्या चायना मांजा व शिकारी प्रथे विरुध्द फलटणमध्ये जनजागृती


Public awareness in Phaltan against China Manja and Hunting practice used on Nag Panchami

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - सांस्कृतिक सण म्हणुन साजरा केला जाणाऱ्या नागपंचमी सणाचे औचित्य साधून,  काही लोक  चायना किंवा नायलॉन मांजाचा वापर करुन पतंग उडवतात. ज्यामधे हजारो पशू-पक्षांना तसेच काही माणसांना आपला जीव गमवावा लागला आहे, तसेच रुढी-परंपरे नुसार नागपंचमीला चालत आलेल्या वन्यजिवांच्या शिकरीच्या घटना पण मागच्या काळात घडल्या आहेत. या बेकायदेशीर कृत्यांच्या विरोधात नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी फलटणच्या  तर्फे सर्व संबंधित शासकीय विभागांमध्ये निवेदन देण्यात आले व फलटण नगरीत यावर विविध उपक्रम घेण्यात आले. ज्यामधे ओडियो क्लिप द्वारे आवाहन करणे, चित्रफितीद्वारे या विषयाचे गांभीर्य लक्षात आणुन देणे आणि चायना मांजा व शिकारी विरोधात प्रभातफेरीच्या माध्यमातून,  वनविभाग फलटण व  नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी फलटणच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करण्यात आली. तसेच  कार्यक्रमातून संस्थेच्या वतीने नागरिकांना, वन्यजीवांचे संरक्षण करुन निसर्ग साखळीचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यात संस्थेला वनविभाग फलटण,गोविंद फाऊंडेशन फलटण, आकांक्षा क्लासेस व प्रा.इंगळे सर यांनी मोलाचे योगदान दिले.

No comments