Breaking News

फलटण येथे कॅफे शॉप मालकावर गुन्हा ; जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याने कारवाई

Crime against cafe shop owner in Phaltan; Action for disobeying the orders of the Collector

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ मे - जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कॅफे शॉपमधील बैठक व्यवस्था सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत न्हवती, दरवाजे पारदर्शी न्हवते तसेच  स्पष्ट प्रकाश योजना नसल्याकारणाने व कॅफे परवाना नसल्यामुळे फलटण येथील कॅफे शॉपवर कारवाई करत मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     फलटण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाअधिकारी यांच्या कार्यालयाकडील आदेश क्र.DC/MG/11 कावि-530/2023दि.१० ५/२०२३ अन्वये दि. २३ मे २०२३ रोजी रोजी १ वाजण्याच्या सुमारास विषेश मोहिमे अंतर्गत कॅफे शॉप चेक करणे कामी  पीएसआय गायकवाड, म.पो.कॉ. करपे, असे   पेट्रोलिंग करीत असताना, लक्ष्मीनगर, फलटण येथे अदित्य कॉफी कॅफे येथे भेटी दरम्यान, त्याचे मालक अदित्य दत्तु मदने याच्याकडे कॅफे बाबतचा परवाना नाही, तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कॅफे शॉपमधील बैठक व्यवस्था सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येईल अशी न्हवती. तसेच दरवाजे पारदर्शक नाहीत व  बैठक व्यवस्था स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना नाही,  सदर कॅफे मालकाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन केले नाही. मा. जिल्हाधिकारी  सातारा यांचे आदेश पारीत झाल्या नंतर त्यास दि.१४ मे २०२३ रोजी जावक क्र.४५८/२०२३ आदेशाआन्वये सुचीत केलेले होते, तरी देखील त्याने कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही, तरी अदित्य कॉफी कॅफे चे मालक अदित्य दत्तु मदने रा.फलटण यांनी यांचेकडे कॅफेचा परवाना नसल्याने व  त्यांना मा. जिल्हाधिकारी सो.सातारा यांच्या दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही म्हणुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सोनवलकर करीत आहेत.

No comments