Breaking News

विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःचे पायावर उभे राहावे - आ. दिपकराव चव्हाण

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp concluded at Phaltan

फलटण येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर संपन्न

फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ मे - दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन, कौशल्य आत्मसात करून,  स्वतःचे पायावर उभे राहावे असे आवाहन आमदार दिपकराव चव्हाण यांनी केले. 

फलटण येथे दि.२३ मे २०२३ रोजी आयटीआय फलटण यांच्या वतीने कौशल्य, रोजगार  उद्योजकता  आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर  मोठ्या उत्साहात पार पडले. या करिअर शिबिराचा शुभारंभ आमदार दीपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार  दीपकराव चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य श्री. एन के माने  हे होते.   जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री धुमाळ, ढोबळे सर, डॉ. पडळकर सर, खरात सर, मंजित सर, डॉ. प्रशांत निंबाळकर सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शन मेळाव्यात प्राध्यापक डॉ पडळकर  संचालक चैतन्य अकादमी बारामती यांनी NIIT, JEE  व CET यांबद्दल माहिती दिली. प्राध्यापक श्री खरात एस. एम. यांनी  एग्रीकल्चर मधील सुवर्ण संधी सांगितल्या. कार्रवर एव्हीशन चे मंजीत सर यांनी पायलट ट्रेनिंग संबंधी माहिती दिली. तसेच प्राध्यापक डॉ. प्रशांत निंबाळकर  सर यांनी मुलाखत तंत्र व सॉफ्ट स्किल्स या बद्दल माहिती दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री रूपनर  सर यांनी केले व आभारप्रदर्शन श्री  एस एम धुमाळ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सातारा यांनी केले.

No comments