Breaking News

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी

More than 70 candidates from Maharashtra are successful in the Central Public Service Commission Examination

    नवी दिल्‍ली, 23 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

    (25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (495) दीपक यादव, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552)  लोकेश पाटील, (558)  ऋत्विक कोट्टे, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691)  सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762) अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922)  निहाल कोरे.

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी-मे 2023 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933  उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये खुला (ओपन) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 72  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41  दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28,  इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04  उमेदवारांचा समावेश आहे.

   या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 04,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 201, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  45 , इतर मागास प्रवर्गातून – 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 131   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19   तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण  933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांची विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल.

निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

No comments