आसू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; युवकासह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ एप्रिल - आसू ता. फलटण येथे अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला घराच्या पाठीमागे ओढत नेऊन, तिथे तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून आसू येथील युवकाने विनयभंग केला. याबाबत युवकांच्या वडिलांना सांगण्यासाठी गेल्यानंतर, तिथे पीडित मुलीच्या चुलत भावास मारहाण केल्याप्रकरणी आसू येथील युवकास इतर दोघांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आसू ता. फलटण गावचे हद्दीत, दि.२० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८.३२ वाजता पीडित मुलीच्या घरा समोर राहणारा आसिफ शेखलाल शेख वय २४ वर्षे रा. आसू ता. फलटण यांने, पीडित मुलगी ही घरात एकटी असल्याचे पाहून, मुलीच्या हाताला धरून जबरदस्तीने ओढत घराचे पाठीमागे नेऊन, तिथे तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत पीडितेचा चुलत भाऊ निजाम याने आसिफच्या वडिलांना सांगण्यासाठी गेला असता, आसिफचे वडील शेखलाल मेहबूब शेख व त्यांचा नातेवाईक लखन शेख यांनी पीडितेचा चुलत भाऊ निजाम यांच्या बरोबर भांडण करून, शेखलाल महबूब शेख यांनी डोक्याच्या पाठीमागे काठीने मारले व लखन शेख रा. गोखळी यांनी डावे हाताच्या अंगठ्यावर काठीने मारून पीडितेच्या चुलत भावास जखमी केले असल्याची फिर्याद पीडित मुलीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार सर्व आरोपींच्या विरोधात भा.द.वि.सं. अंतर्गत व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनी भोसले हे करीत आहेत.

No comments