आसू येथे मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ एप्रिल - मौजे आसू ता. फलटण येथे एकास लोखंडी पाईपने डोक्यात मारून, हाताने लाथा बुक्क्याने मारहाण करून, त्याच्या मुलास हाताने मारहाण केल्याप्रकरणी आसू येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि २०/४/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मौजे आसू तालुका फलटण गावचे हद्दीत शेखलाल मेहबूब शेख यांच्या घरासमोर चिकन सेंटर शेजारी, १) निजाम हुसेन सौदागर वय ३४ वर्षे रा. आसु ता. फलटण जिल्हा सातारा २) सलीम हुसेन सौदागर वय २८ वर्ष रा. आसु ता. फलटण जिल्हा सातारा ३) शफिक हुसेन सौदागर वय ३३ वर्षे रा. आसु ता.फलटण जिल्हा सातारा ४) मोहम्मद हुसेन सौदागर राहणार वय ३६ वर्ष रा. आसु ता. फलटण यांनी शेखलाल मेहबूब शेख यांचा मुलगा आसिफ यास हाताने मारहाण केली. तसेच शेखलाल मेहबूब शेख यांना लोखंडी पाईपने डोक्यात मारून, हाताने लाथा बुक्क्याने मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद शेखलाल मेहबूब शेख रा. आसू यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सूर्यवंशी हे करीत आहेत.

No comments