बरड येथे विवाहितेवर बलात्कार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : बरड ता. फलटण येथील एका विवाहित महिलेवर बलात्कार करुन तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बुधनवरवाडी ता. फलटण येथील एकावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बरड येथील संबंधीत महिला घरात एकटी असताना, दि. १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संतोष महादेव चव्हाण रा. बुधनवरवाडी ता. फलटण याने अचानकपणे घरी पाठीमागुन येवून घराची आतुन कडी लावत तीच्या इच्छेविरुध्द जबरदस्ती करुन तिच्याशी शारीरिक संबंध केले. तसेच याबाबत घरातील कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. सदर प्रकाराबाबत महिलेने भितीमुळे कुणाला काही सांगितले नव्हते परंतु पतीशी चर्चा करुन दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १७ एप्रिल २०२३ रोजी चव्हाण याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढिल तपास सोपोनि भोसले करीत आहेत.
No comments