Breaking News

पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघे ताब्यात ; 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

Two arrested with pistol and live cartridge; Property worth Rs 1 lakh 80 thousand seized

    सातारा दिनांक 16 प्रतिनिधीपिस्तूल विक्रीसाठी वाढे फाटा तालुका सातारा येथे आलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ताब्यात घेतले . त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट , जिवंत काडतूस , देशी बनावटीचे पिस्तूल व एक मोटर सायकल असा एक लाख ऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई मंगळवारी दुपारच्या दरम्यान करण्यात आली.

    ओम बापूराव महानवर राहणार साखरवाडी तालुका फलटण व श्रीय उर्फ माँटी शरद खताळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे .तसेच त्यांचा एक अन्य साथीदार पोलिसांनी अन्य ठिकाणावरून ताब्यात घेतला आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित इसम वाढे फाटा येथे इस्तूलाची विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती . त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष दातीर पोलिसा अंमलदार आतिश घाडगे , संतोष सपकाळ,विजय कांबळे, संजय शिर्के यांचे पथक तैनात केले .पोलिसांनी येथे दोन संशयित इसमांना त्यांच्या हालचालीवरून तत्काळ ताब्यात घेतले . त्यांच्याकडे पिस्तुलासह काडतुसाचा मुद्देमाल आढळून आला . संबंधितांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 ,7 व 25 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    या तपासात प्रवीण कांबळे,सनी आवटे,अमोल माने, अजित करणे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, अरुण पाटील, मनोज जाधव,शिवाजी भिसे ,राकेश खांडके, अमित झेंडे , रवी वर्णेकर,वैभव सावंत, स्वप्निल दौंड,संकेत निकम यांनी सहभाग घेतला होता.

No comments