सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, मनमिळावू, समतोल व निष्पक्ष वृत्तीचे ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ जुलै २०२५ - फलटणमधील ज्येष्ठ व सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे आज सकाळी नागपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण फलटण शहर व तालुका शोकमग्न झाला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रा. रमेश आढाव हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपल्या धारदार लेखणीतून मांडले. समाजातील विविध घटकांशी संवाद साधत जनतेच्या अडचणी, समस्या व प्रश्नांना वाचा फोडणारे, मनमिळावू, समतोल व निष्पक्ष वृत्तीचे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरून तसेच फलटण मध्ये ठीकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात अली.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्यावर उद्या, दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या मूळगावी गुणवरे (ता. फलटण) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गंधवार्ता परिवार ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव सरांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होतो
No comments