कै. विनायकराव पाटील यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ जुलै २०२५ - लोकनेते स्व. विनायकराव शामराव पाटील (आबा) यांच्या जयंती निमित्त लोकनेते स्व. विनायकराव शामराव पाटील प्रतिष्ठान, आंदरुड यांच्या वतीने शनिवार दि. १९/७/२०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिर हनुमान मंदिर सभामंडप, आंदरूड, ता. फलटण, जि. सातारा येथे शनिवार दि. १९/७/२०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत असेल. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकास प्रोत्साहनपर एक भेटवस्तू देण्यात येणार आहे, यामध्ये ईयर बडस्, थर्मास बॉटल, रेनकोट याचा समावेश असल्याची माहिती लोकनेते स्व. विनायकराव शामराव पाटील प्रतिष्ठान, आंदरुड यांच्या वतीने देण्यात आली आहे.
No comments