Breaking News

फलटणचे सुपुत्र मुकेश विनायक अहिवळे यांनी राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्ली येथे स्वीकारला पुरस्कार

Mukesh Vinayak Ahivale, son of Phaltan, received the award from the President in Delhi

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ जुलै -   केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेतली जाते. सण 2024 रोजी घेतलेल्या स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशात  पुन्हा एकदा बाजी मारली आहे. शासनाकडून या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा  निकाल जाहीर करण्यात आला व त्यामध्ये कराड नगर पालिकेने 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील पालिकांमध्ये देशात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.  दि. 17 जुलै रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न झाला.

    स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांनी व राज्यातील नगर पालिकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल आज अधिकृतरितीने जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत देशाच्या   50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील पालिकांमध्ये कराड पालिकेने देशात दुसरा क्रमांक प्राप्त केला.

    दि. 17 जुलै रोजी दिल्ली येथे महामाहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर,  आरोग्य निरीक्षक मुकेश विनायक अहिवळे व इतर कर्मचारी यांनी पुरस्कार स्विकराला.

    स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून कराड शहरात अनेक स्वच्छतेची कामे करून सातारा जिल्ह्यातील कराड नगर पालिकेने देशात नाव लौकिक मिळवला आहे.

    कराड पालिकेने यापूर्वी देखील जेव्हा 2019 व 20 अशी दोन वर्षे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होत देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. तर 2021 या वर्षी सहावा तर सण 2022 साली देशात तिसरा क्रमांक मिळवला होता. 2019 मध्ये तत्कालिन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कालावधीत कराड पालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही स्वच्छतेत सातत्य राखल्याने कराड पालिका अव्वल स्थानावर पोहोचली.

    तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड पालिकेने या स्पर्धेची तयारी केली होती. त्यावेळी कराड पश्चिम विभागात प्रथम आले. आता 2024 सालच्या स्पर्धेत कराडने देशात दुसरे स्थान पटकावले आहे.

No comments