इलेक्ट्रीक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी जेरबंद ; १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ जुलै २०२५ - फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इलेक्ट्रीक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून जेरबंद करण्यात आले आहेत. या कारवाईत ०४ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण १०,१३,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत एकुण ०४ जणांना अटक करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यामधून शिक्रापूर ते कर्नाटक अशी इलेक्ट्रीक टॉवर लाईनचे काम चालू आहे. त्याठिकाणी याअगोदर २ वेळा टॉवरच्या अॅल्युमिनियम तार चोरीचा प्रयत्न व घटना घडली होती. त्याअनुशंगाने प्रतिबंध करणेकामी पोलीस अधिक्षक, तुषार दोशी यांनी पो.नि सुनिल महाडिक यांना प्रभावीपणे कारवाई करणेचा आदेश दिले आहेत.
आदेशाप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व स्था.गु.शा. सातारा असे संयुक्तपणे सदर गुन्हयांचे अनुशंगाने तपास व गोपनीय माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा सचिन संभाजी जाधव, रा. राजाळे, ता. फलटण व त्यांचे इतर साथीदारांनी केला असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे आरोपी धर्मराज बाळू जाधव, रा. रांजणी, पो. मार्डी, ता. माण, जि. सातारा. २) सुरज विभीषन बेलदार, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा. ३) सागर संभाजी जाधव, रा. राजाळे. ता. फलटण, जि. सातारा, ४) रजत अंकुश मदने, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा यांना शिताफीने पकडून अधिक चौकशी केल्यावर त्यांनी इतर फरारी आरोपी निनाद तानाजी जाधव, रा. पिंपरद, ता. फलटण, सचिन संभाजी जाधव, ऋषीकेश सोमनाथ मदने, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, दिपक गोंविदा पाटील, अक्षय गोंविदा पाटील, रा. चाकण पुणे व इतर अनोळखी इसमांचे साथीने केला असल्याची कबुली दिली. त्यांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं.५०२/२०२५, भा. न्याय संहिता कलम ३०३ (२) मध्ये अटक करण्यात आली असून त्यांचेकडून १०,१३,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, तसेच त्यांचेकडून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, गु.र. नंबर ४८६/२०२५, भा. न्याय संहिता कलम ३०३(२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, गु.र.नंबर १७१/२०२५, भा. न्याय संहिता कलम ३०३ (२), गु.र. नंबर १७६/२०२५, भा. न्याय संहिता कलम ३०३ (२) असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी सचिन संभाजी जाधव, दिपक पाटील, अक्षय पाटील हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर बरेच मालमत्ता व शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध २ पोलीस तपास टिम पुणे याठिकाणी ठाणमांडून घेत असून मिळून आल्यावर बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहूल धस यांच्या सूचनांनुसार, अरूण देवकर, पोलीस निरीक्षक, स्था, गु. शाखा, सुनिल महाडीक, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे जी.बी. बदने, पो. उपनि, पो.हवा. नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पो.कॉ. हनुमंत दडस. तुषार नलवडे व स्था.गु. शाखेचे सहा. पो. फौजदार अतिश घाडगे, पो.हवा. सपकाळ, जगधने, कापरे, पो.ना. पवार व पो.कॉ. अविनाश चव्हाण यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.
No comments