उपळवे येथे दुचाकीचा अपघात ; एक ठार ,एक जखमी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - उपळवे ता. फलटण गावच्या हद्दीत, पुसेगाव रोडवर झालेल्या मोटरसायकलच्या अपघातामध्ये मोटारसायकलस्वारा पैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मौजे उपळवे ता. फलटण गावचे हद्दीत, फलटण ते पुसेगाव जाणारे रोडवर १) रामचंद्र जयसिंग ढेंबरे वय ६० वर्षे २) स्वप्निल रामचंद्र ढेंबरे दोन्ही रा. बोडकेवाडी ता. फलटण हे त्यांच्या मोटरसायकल नं. एमएच ११ एडब्लु ९९०७ या दुचाकीवरून पुसेगाव येथून बोडकेवाडी येथे जात असताना, त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात स्वप्निल रामचंद्र ढेंबरे यास उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे व रामचंद्र जयसिंग ढेंबरे वय ६० वर्षे रा. बोडकेवाडी ता. फलटण हे मयत झाले असून सदर अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी फिर्याद वैभव बचाराम ढेंबरे यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम या करीत आहेत.
No comments