Breaking News

राजाळे येथे कत्तलीसाठी चालवलेली जनावरे पकडली ; ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Animals driven to slaughter were caught at Rajale; 6 lakh 50 thousand seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  -  राजळे - पिंप्रद रोडवर राजाळे ता. फलटण गावच्या हद्दीत, पिकप गाडीमध्ये कत्तलीसाठी चालवलेल्या जर्सी गाई सापडल्या असून, फलटण ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत, एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, ३ जणांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता, मौजे राजाळे तालुका फलटण गावचे हद्दीत, राजाळे - पिंप्रद  रोडवर, जानुबाई मंदिराजवळ,  पिकअप क्रमांक एम एच ४२ एम ४१७५ वरील चालक खाजा अब्बास शेख वय २५ वर्ष रा. सरडे ता. फलटण व त्याच्या सोबत असलेले दोन इसम रफिक मकबूल शेख वय २० वर्षे रा.सरडे ता. फलटण व सोहेल चांद शेख वय २० वर्ष रा. सरडे ता. फलटण यांनी मिळून स्वतःचे आर्थिक फायद्या करिता, तीन जर्सी गाईंना चारा  पाण्याची सोय न करता, कत्तल करण्याचे इराद्याने, कमी जागेमध्ये निर्दयपणे दाटीवाटीने भरून,  घेऊन जात असताना मिळून आल्या.  याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत, पिकअप व ३ जर्सी गायी असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, वरील तिघांच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ हे करीत आहेत.

No comments