Breaking News

फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उलंघन - अकॅडमी व्यवसाय उफाळले ; नियम पाळले नाहीत तर आंदोलन - सनी काकडे

Violation of coaching classes regulations in schools in Phaltan - academy business boomed; Protest if rules are not followed - Sunny Kakade

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ जुलै २०२५ फलटण शहरातील अनेक खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून अत्याधिक फी वसूल करण्यासाठी अकॅडमी बसवण्याची प्रथा वाढत चालली आहे. शासनाच्या अनुदानित शाळांमध्येही, या अकॅडमींचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळांचे संस्थापक आणि अकॅडमी मालक यांच्यात हे उद्योग सुरू असून विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक त्रास देत आहेत.

    अशा अकॅडमी बिनमान्यता असून, त्यांचा अभ्यासक्रम आणि शिक्षणाच्या पद्धतीवर सरकारने ठरवलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने गंभीर प्रकरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि वर्गांमध्ये भेदभाव निर्माण होतो. विशेषतः एक ते दहावीत शिकणाऱ्या मुलांना मूलभूत गोष्टी समजत नसतानाही, त्यांच्यावर अकॅडमींची सक्ती केली जाते व अधिक शुल्क उकळवले जाते.

    शाळांमध्ये शिक्षकांमध्ये शिक्षण देण्याच्या पद्धतीत कमतरता असल्यास, त्या शिक्षकांना हकालपट्टी करण्याऐवजी अकॅडमी चालवण्याचा धंदा सुरू ठेवला जात आहे. कामगार संघर्ष संघटना या प्रकाराच्या अकॅडमींचा प्रखर विरोध करत असून, स्थानिक गट शिक्षण अधिकारी व दंडाधिकारी यांच्याकडून त्वरित कारवाईची मागणी करत आहे.

    भारत सरकारने जाहीर केलेल्या कोचिंग क्लासेस नियमावलीचे पालन फलटणमधील अकॅडमीमध्ये होत नसल्यामुळे शासनाने त्वरित या अकॅडमी बंद करण्याचे आदेश द्यावेत अशी संघटनेची मागणी आहे. अन्यथा कामगार संघर्ष संघटनेकडून आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष सनी काकडे यांनी कळविले आहे.

No comments