आरडगाव येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ जुलै २०२५ - मौजे आरडगाव येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.
सरपंच सौ.रूपाली अंकुश जाधव, उपसरपंच धनंजय नाथाजी बागडे, सदस्या( मा. उपसरपंच) अरुणा रमेश भोईटे, सदस्या कल्याणी भोईटे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश मनोहर भोईटे,मा.चेअरमन हेमंत भोईटे, माजी सरपंच श्री बाळकृष्ण भोईटे, माजी सरपंच चंद्रकांत भोईटे, विक्रांतदादा भोईटे,राजेंद्र भोईटे, हनुमंत भोईटे, श्रीधर भोईटे या सर्वांसह कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश संपन्न झाला.
यावेळी अभिजीतभैया नाईक निंबाळकर, फलटण तालुका भाजपा अध्यक्ष अमित रणवरे, दत्तराज नाईक निंबाळकर, माजी उपसरपंच संदीप बाळासो भोईटे, राजेंद्र निंबाळकर,विशाल भोईटे, अलंकार भोईटे हे उपस्थित होते. यावेळी रणजितदादांनी आरडगाव गावाला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
No comments