फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेधारकांचा ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ जुलै २०२५ - फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व व्यापारी गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न व अडचणी मिटवण्यासाठी अनेक वर्षांचा चालू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी अन्याय दूर करून न्याय मिळवण्यासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेधारकांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश, पंचायत राज व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार
रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे दिनांक १२/७/२०२५ रोजी ५ वाजता होणार आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, नगर पालिका माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ज्येष्ठ नेते विलासराव नलवडे, जिल्हा सरचिटणीस भाजपा जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक सुदामआप्पा मांढरे, युवा नेते अभिजीत भैया नाईक निंबाळकर, तालुकाध्यक्ष भाजप बापूराव शिंदे, तालुकाध्यक्ष भाजप लक्ष्मणराव सोनवलकर, तालुकाध्यक्ष भाजप अमित रणवरे उपस्थित राहणार असल्याचे
अॅड. नरसिंह निकम (अध्यक्ष्य फलटण तालुका संघर्ष समिती) व कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाळेधारक यांनी कळविले आहे.
No comments