Breaking News

यंदाचा शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पुढाकार

Guardian Minister Shambhuraj Desai's initiative to celebrate this year's Shiv Pratap Day with great enthusiasm

    सातारा -  यावर्षी ३० नोव्हेंबर रोजी किल्ले प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. यंदाच्या वर्षी हा दिन मोठया उत्साहात साजरा व्हावा यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.

  शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी त्याचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या निमित्ताने प्रतापगड येथे आयोजित करावयाच्या कार्यक्रमाविषयी उद्या आढावा बैठकही बोलावण्यात आली आहे.

     यंदाचा शिवप्रताप दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला ती तिथी शिवप्रताप दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गडावर भवानी मातेची पूजा, पालखी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्षवृष्टी तसेच मर्दानी खेळांचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमांमध्ये आणखी विविध उपक्रम राबविण्याविषयी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे व हा दिन मोठया उत्साहात साजरा व्हावा अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या आहेत.

No comments