Breaking News

फलटण येथे १० लाख ८० हजारांची जबरी चोरी ; एक गंभीर

Forcible theft of 10 Lakh 80 thousand in Phaltan 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - शांतिकाका सराफ या सोन्या-चांदीच्या दुकानाचा सिक्युरिटी गार्ड बँकेत रक्कम जमा करण्यासाठी  जात असताना, त्यास लक्ष्मीनगर फलटण येथे अडवून, त्यास गंभीर दुखापत करत, गाडीच्या डिकीमधील १० लाख ८० हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्या प्रकरणी २ अज्ञात इसमाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, दि. २१/११/२०२२ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास शांतीकाका सराफ, पृथ्वी चौक फलटण यांचा सिक्युरिटी गार्ड सनी हणमंत इंगळे रा.झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण हा आयसीआयसीआय बँकेत रक्कम भरण्यासाठी  एक्टिवा मोपेड दुचाकी गाडीवरून चालला होता. लक्ष्मीनगर परिसरातून उपळेकर मंदिराकडे जाणाऱ्या रोडने जात असताना, राजवैभव घराच्या समोर लक्ष्मीनगर फलटण  येथे दोन इसम हे शाईन मोटार सायकलवरुन सनी इंगळे याच्या गाडीच्या पुढे येवुन,  गाडी आडवी मारली व इंगळे यास थांबवले. पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील हत्याराने सनी इंगळे याच्या डोक्यात मारले. त्यावेऴी सनी इंगळे खाली पडला. शाईन दुचाकी चालवित असलेल्या इसमाने गाडी लावुन, 'तुला लय माज आला आहे' असे म्हणुन, सनी इंगळे यास लाथाबुक्यांनी मारहाण केली व गाडीच्या डिक्कीत असलेली रोख रक्कम १० लाख ८० हजार रुपये घेवुन गेले असल्याची फिर्याद सनी हणमंत इंगळे यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केनेकर हे करीत आहेत.

No comments