फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात कोल्ह्याचा वावर
![]() |
फलटण शहरात आढळलेला वन्य प्राणी कोल्हा. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या २/३ दिवसांपासून कोल्हा या वन्य प्राण्याचा वावर असल्याचे आढळल्याने घबराटीचे वातावरण पसरले असताना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी खात्री करुन घेऊन सापळा लावला आणि सदर वन्य प्राणी पकडल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी दिलेल्या माहिती नुसार, शिंपी गल्ली व पवार गल्ली, फलटण परिसरातील नाईक निंबाळकर वाडा, पंकज पवार वाडा परिसरात वन्यप्राणी कोल्हा वावरत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर उप वन संरक्षक सातारा महादेव मोहिते साहेब, सहाय्यक वन संरक्षक रेश्मा व्होरकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवार दि. ३ रोजी फलटण येथील जबरेश्वर मंदिर नजिक, पवार गल्ली येथे पंकज पवार सर यांचे वाड्यामध्ये वन्यप्राणी कोल्हा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन परिमंडळ अधिकारी राजेंद्र कुंभार, वनरक्षक फलटण सारिका लवांडे व वन कर्मचारी, WLPRS प्राणी मित्र सचिन जाधव, अभिजीत निकाळजे, TEAM RESQ बारामतीचे श्रेयश कांबळे, ऋषी मोरे, पंकज पवार, अतुल जाधव, साकेत अहिवळे, महेश धंगेकर, बापूराव फरांदे, कुंडलिक मदने यांच्या सहकार्याने सलग ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोल्हा वन्य प्राणी सुखरुप रेस्क्यू करण्यात (पकडण्यात) आला.
वन विभाग फलटण यांचे माध्यमातून सदर वन्य प्राण्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास कोणतीही दुखापत नसल्याची खात्री करुन सदर वन्य प्राणी कोल्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी सांगितले.
No comments