Breaking News

उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता यांच्यासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका : फुगडी खेळून कार्तिक वारीचा लुटला आनंद

The Deputy Chief Minister along with his wife Amrita held the play on Gyanoba-Mauli ;Karthik Vari enjoyed playing with Fugdi

पंढरपूर  (उ. मा. का.) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ठेका धरून रंगत आणली. ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष सुरू असताना श्री. फडणवीस यांनी गळ्यात टाळ अडकावून वारकऱ्यांना साथ दिली. तर श्रीमती फडणवीस यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात फेर धरला.

…अन दोघांनीही घेतला फुगडीचा आनंद
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांना फुगडी खेळण्याचाही मोह आवरला नाही. दोघांनीही बालवारकऱ्यांसह इतर वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून कार्तिकी वारीचा आनंद साजरा केला.

यावेळी आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले उपस्थित होते. 

No comments