श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.५ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क अभियानामध्ये आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व जयकुमार गोरे यांच्या पुतळा जाळला दहन याच्या निषेधार्थ भाजपाकडून फलटण शहरातील गजानन चौकात आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या पुतळ्याचे दहन व खासदारांच्या विरोधात केलेले वक्तव्याचा जाहीर निषेध करत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी यावेळी सांगितले.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने आमदार जयकुमार गोरे यांचा पुतळा जाळण्यात आला याच्या निषेधार्थ आज आम्ही रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन करत असल्याचे भाजपाचे फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते यांनी सांगितले.
No comments