खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला ; वातावरण तंग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनीही सायंकाळी डी.एड. चौक याठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुतळा जाळला. त्यामूळे फलटण शहरासह तालुक्यात वातावरण तंग झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क अभियानामध्ये आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपाकडून फलटण शहरातील गजानन चौकात आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. त्याचे तीव्र पडसाद उमटले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फलटणच्या डि.एड.चौकात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध केला.
No comments